पान 3 : बाळ्ळी-फातर्पा पुलाची निविदा जाहीर- डिसेंबरपूर्वी काम पूर्ण होणार
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
बाळ्ळी-फातर्पा पूल
पान 3 : बाळ्ळी-फातर्पा पुलाची निविदा जाहीर- डिसेंबरपूर्वी काम पूर्ण होणार
बाळ्ळी-फातर्पा पूलडिसेंबरपूर्वी काम पूर्ण होणारनिविदा जारी : आठवड्याभरात कामाला सुरुवात कुंकळ्ळी : बाळ्ळी-फातर्पा पुलाची निविदा जाहीर झाली असून साडेचार कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात येणार आहे. बाळ्ळी-फातर्पा पुलाच्या रुंदीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून आमदार राजन नाईक यांनी हा पूल उभारण्यासाठी सरकारकडे मागणी लावून धरली होती. फातर्पा ही देवभूमी असून या भागात चार मोठी देवस्थाने व इतर काही देवस्थाने आहेत. शेकडो भक्त फातर्पाला भेट देतात. बाळ्ळी येथील पूल अरुंद असल्यामुळे वाहतुकीची नियमितपणे कोंडी होत होती. जत्रोत्सवाच्या वेळी तर या अरुंद पुलामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावे लागत होते. आमदार राजन नाईक यांनी बाळ्ळी-फातर्पा पूल उभारण्याचे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांना दिले होते. या पुलाची निविदा जाहीर झाल्यामुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केला असून डिसेंबर महिन्याच्या पूर्वी हा पूल बांधून पूर्ण होणार आहे. सध्याचा पूल तसाच ठेवून समांतर पूल उभारण्यात येणार असून यासाठी येत्या आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे.दरम्यान, कुंकळ्ळी-माड्डीकटा येथील बालोद्यान प्रकल्प व ट्रेकिंग प्रकल्पाची कोनशिला शनिवार, दि. 8 रोजी बसवली जाणार आहे. आमदार राजन नाईक यांनी येणार्या काही दिवसांत आपली सर्व विकासकामे मार्गी लागणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)