पान १ - २५० कोटी रुपयांच्या काळ्यापैशाचा पर्दाफाश
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
२५० कोटी रुपयांच्या काळ्यापैशाचा पर्दाफाश- केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेची कारवाई- बोगस कंपन्यांद्वारे झाला काळा पैसा पांढरानवी दिल्ली - काळापैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे पैशाची फेराफेरी करणारे एजंट आणि बनावट कंपन्या यांचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेला यश आले आहे. या ताज्या प्रकरणात तब्बल २५० कोटी रुपयांचा ...
पान १ - २५० कोटी रुपयांच्या काळ्यापैशाचा पर्दाफाश
२५० कोटी रुपयांच्या काळ्यापैशाचा पर्दाफाश- केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेची कारवाई- बोगस कंपन्यांद्वारे झाला काळा पैसा पांढरानवी दिल्ली - काळापैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे पैशाची फेराफेरी करणारे एजंट आणि बनावट कंपन्या यांचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेला यश आले आहे. या ताज्या प्रकरणात तब्बल २५० कोटी रुपयांचा ब्लॅकमनी व्हाईट केल्याचे उघड झाले आहे. प्रामुख्याने काळापैसा खिशात असलेल्या लोकांनीच आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे, त्या अनुषंगाने आता या लोकांच्या दिशेने कारवाईची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे.अलीकडेच कोलकाता आणि दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर काही एजंटांनी बनावट चलने बनवून त्याचे व्यवहार केल्याची माहिती विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास केला असता २५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. तपास यंत्रणेतील अधिकार्याने या व्यवहारांची कार्यपद्धती विशद करताना सांगितले की, ज्या व्यक्तीकडे काळापैसा आहे, त्याने अशा बनावट कंपन्या आणि त्यांची चलन बनविणार्या एजंटशी संपर्क साधला. त्याला रोखीने पैसे देऊन खरेदी केल्याचे चलन विकत घेतले. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने १०० रुपये रोखीने देत १०० रुपयांचा माल विकत घेतल्याचे बिल घेतले. मात्र, ज्याच्याकडून हे बिल घेतले त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला १०० रुपयातून दोन रुपयांचे कमिशन वजा करून ९८ रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर, ज्या व्यक्तीने १०० रुपयाने बिल दिले, त्याने तेच खरेदी बिल अन्य व्यक्तीला ११० रुपयाला विकून स्वत:चा पैसे नियमित करून घेतले. अशाच पद्धतीची एक मोठी साखळी विणली गेली आणि ज्या उद्योगात रोखीचे व्यवहार होतात, अशा लोकांना गाठून ते पैसे धनादेशाद्वारे त्यांच्या खात्यात जमा करून नियमित करून दिल्याचे तपासात उघड झाले. तसेच, व्यवहार झाल्यानंतर या कंपन्याही गायब झाल्याचे दिसून आले आहे. तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीमुळे काळा पैसा पांढरा होण्याचा प्रकार तर उघड झालाच, पण या सर्व व्यवहारात व्हॅट आणि सेवा कर किती बुडाला याचाही तपास आता सुरू झाला आहे. तर, दुसरीकडे एजंटांनी धनादेशाद्वारे पैसे परत केल्याने प्राप्तिकर विभागानेही आता याचा तपास सुरू केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)