शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विरोध प्रदर्शनानंतरही बॉक्स ऑफिसवर पद्मावत हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 12:06 IST

अनेक अडचणींवर मात करत अखेर बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या पद्मावत या चित्रपटानं भरगच्च कमाई केली आहे. 25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

नवी दिल्ली- अनेक अडचणींवर मात करत अखेर बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या पद्मावत या चित्रपटानं भरगच्च कमाई केली आहे. 25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील चित्रपटगृहांच्या बाहेर हिंसा आणि विरोध प्रदर्शनाचे प्रकार समोर आले आहेत. परंतु या चित्रपटानं आतापर्यंत 20 कोटींची कमाई केली आहे.एवढं होऊनही देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पद्मावतसाठी 50 ते 60 टक्के तिकिटांचं बुकिंग झालं आहे. रिपोर्टनुसार, काही शहरांमध्ये भीतीपायी चित्रपट प्रदर्शित झाला नाही, परंतु ज्या शहरांत पद्मावत प्रदर्शित झाला तिथे हाऊसफुल्ल झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली आहे. एवढं नव्हे, तर ऑस्ट्रेलियातही पद्मावत चित्रपटाला ग्रँड ओपनिंग मिळाली आहे.  

उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला होता. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील चित्रपटगृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या दिवशी चार हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि 10 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

न्यायालयाचा अवमान-पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अ‍ॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर 29 जानेवारीला सुनावणी आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन रा. स्व. संघाच्या वायव्य विभागाचे प्रमुख भगवती प्रकाश यांनी केले. त्यामुळे या आंदोलनामागे भाजपा व संघ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Padmavatपद्मावत