शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

38 वर्षांपासून भागवताहेत भुकेल्यांची भूक, लंगर बाबांचा पद्मश्रीनं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 19:32 IST

भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत पंजाबच्या चंडीगढमधील लंगर बाबा यांचेही नाव आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार, महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने ही पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये, पंजाबमधील लंगर बाबा यांनाही हा पुरस्कार जाहीर होणार आहे.

भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत पंजाबच्या चंडीगढमधील लंगर बाबा यांचेही नाव आहे. लंगर बाबा यांचे पूर्ण नाव जगदीश लाल अहुजा असे आहे. गेल्या 38 वर्षांपासून भुकेल्यांना आणि गरजवंताना अन्न पुरविण्याचं काम ते करत आहेत. जगदीशलाल यांच्या याच सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे नाव लंगर बाबा असे पडले आहे. पीजीआय. चंडीगढच्या बाहेर गेल्या 20 वर्षांपासून दाळ-भात आणि चपाती या भोजनाचं लंगर ते लावत आहेत. दररोज 500 ते 600 व्यक्तींच्या जेवणाची सोय त्यांच्याकडून केली जाते. तर, चिमुकल्यांना खेळणीही दिली जाते. दुसऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आपली जमिनही विकली. आपल्या आजीकडूनच त्यांना सेवेचं आणि लंगरची प्रेरणा मिळाली. भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जगदीश हे केवळ 12 वर्षांचे होते. त्यावेळी, आपल्या कुटुंबासह ते भारताच्या पंजाबमधील मानसा या शहरात वास्तव्यास आले. त्यावेळी, रेल्वे स्थानकावर फरसाण विकण्याचं कामही त्यांना करावं लागलं. त्यानंतर, ते पटयाला येथे आले, तेथे गुळ आणि फळं विकून त्यांनी उदरनिर्वाह केला. वयाच्या 21 व्या वर्षी ते चंडीगढ येथे आले. तेथे केळीचा व्यवसाय करुन त्यांनी मोठी कमाई केली.

टॅग्स :foodअन्नchandigarh-pcचंडीगढ़Governmentसरकारdelhiदिल्ली