शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावत चित्रपटानं आतापर्यंत कमावला 150 कोटींचा गल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:26 IST

करणी सेनेच्या विरोधानंतरही पद्मावत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पद्मावतनं आतापर्यंत 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

नवी दिल्ली- करणी सेनेच्या विरोधानंतरही संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पद्मावतनं आतापर्यंत 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे पद्मावत हा चित्रपट चार प्रमुख राज्यांत प्रदर्शित झालेला नाही, तरीही पद्मावतनं केलेल्या कमाईमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतात नाही, तर परदेशातही या चित्रपटानं भरमसाट कमाई केली आहे.जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत 300 कोटींपेक्षा अधिक गल्ला कमावला आहे. तर भारतातही या चित्रपटानं 150 कोटींची कमाई केली आहे. गेल्या महिन्याच्या तारखेला प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ने  पेड प्रिव्ह्यूमध्येच पाच कोटी कमावले होते, दुस-याच पहिल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला 19 कोटी, 26 जानेवारीला 32 कोटी, 27 जानेवारीला 27 कोटी, 28 जानेवारीला 31 कोटी, 29 जानेवारीला 15 कोटी, 30 जानेवारीला 14 कोटी आणि 31 जानेवारीला 12 कोटी अशा प्रकारे या चित्रपटानं गल्ला जमवला आहे. मात्र तरीही परदेशात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये चित्रपट बंपर कमाई करीत आहे. एका आठवड्यातच चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमध्ये जवळपास 106 कोटींची कमाई केली. त्यामुळे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शनचे आकडे 308 कोटींपर्यंत गेले आहेत. खरंतर हा सिनेमा डिसेंबर 2017मध्ये रिलीज होणार होता, मात्र करणी सेनेचा तीव्र विरोध आणि सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यानं सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार 'पद्मावती' सिनेमाच्या नावात 'पद्मावत' असा बदल करण्यात आला होता. संपूर्ण देशभरात, विशेषतः उत्तर भारतात करणी सेनेकडून 'पद्मावत'ला तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता. एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली होती. 

टॅग्स :Padmavatपद्मावत