शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी भाषा न समजल्यानं घेतली शपथ अन् रोज १५० रुपये कमावून उभारली शाळा; आज पद्मश्रीनं झाला सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 18:54 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांमध्ये एक नाव खूप विशेष ठरलं.

नवी दिल्ली-

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांमध्ये एक नाव खूप विशेष ठरलं. कर्नाटकच्या हरेकला हजब्बा यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हजब्बा यांची कहाणी खूप प्रेरणादायी आणि रोमांचक आहे. कर्नाटकच्या मंगलोरचे रहिवासी असलेले ६८ वर्षीय हरेकला हजब्बा एक फळ विक्रेते आहेत. दररोज अवघ्या १५० रुपयांची कमाई करत हजब्बा यांनी प्राथमिक शाळा उभारली. हजब्बा यांच्या याच अमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

प्राथमिक शाळा उभारण्याचा विचार नेमका कसा आला याबाबत विचारलं असता हजब्बा यांनी सांगितलेली कहाणी प्रेरणादायी आहे. काही वर्षांपूर्वी एक परदेशी पर्यटकानं हजब्बा यांच्या फळाच्या दुकानात येऊन त्यांना इंग्रजीत संत्र्याचा भाव विचारला होता. पण हजब्बा यांना इंग्रजी न कळाल्यानं त्यांना काय बोलावं हेच कळेनासं झालं होतं. त्यावर हजब्बा यांना खूप वाईट वाटलं. त्यांचं शिक्षण झालं नव्हतं आणि त्याचवेळी हजब्बा यांनी शाळा उभारण्याची शपथ घेतली. हजब्बा यांनी शपथ पूर्ण देखील केली आणि एक प्राथमिक शाळा उभारली. 

गावात नव्हती एकही शाळा'द बेटर इंडिया'च्या माहितीनुसार हरेकला हजब्बा यांच्या न्यूपाडापु गावात कित्येक वर्ष एकही शाळा नव्हती. गावातील सर्व मुलं शिक्षणापासून वंचित होती. त्यानंतर २००० साली हरेकला हजब्बा यांनी आपली आजवरची सर्व कमाई खर्च करुन एक एकराच्या जागेवर शाळा सुरू केली. 

"मला शिक्षण घेता आलं नाही आणि माझ्या गावातील मुलं शिक्षणापासून वंचित रहावीत असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे शाळा सुरू करण्याचं ठरवलं होतं", असं हजब्बा म्हणतात. खरंतर २०२० सालीच हजब्बा यांना पद्म पुरस्काराची घोषणा झाली होती. पण कोरोना प्रादुर्भावामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद