शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Padma Awards 2022: सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण', कल्याण सिंह यांचाही बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 20:37 IST

Padma Awards 2022: मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे. यातील तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये दिवंगत माजी CDS जनरल बिपिन रावत (मरणोत्तर), दिवंगत भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (मरणोत्तर), राधेश्याम खेमका (मरणोत्तर) आणि प्रभा अत्रे यांच्या नावांचा समावेश आहे. यंदा पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये 128 जणांची नावे आहेत.

याशिवाय, काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांना पद्मभूषण, बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना पद्मभूषण, माजी गृहसचिव राज राजीव महर्षी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत बायोटेकचे संस्थापक कृष्ण लीला आणि त्यांच्या पत्नीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रा यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार