शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पनीरसेल्वम यांच्याकडे पक्ष धुरा, विलीनीकरणाची आज घोषणा, शशिकला, कुटुंबीयांना बाहेरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 10:53 IST

अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, तर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची जबाबदारी राहणार आहे.

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, तर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची जबाबदारी राहणार आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या गटाला दोन-तीन प्रमुख खाती देण्यात येणार आहेत.ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिकाºयांनी स्वाक्षºया कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.महासचिवपद मिळण्याची शक्यताया संदर्भात एक सहा सदस्यीय टीम तयार केल्यानंतर, पनीरसेल्वम यांनी शनिवारीच स्पष्ट केले होते की, आम्ही लवकरच एक चांगली बातमी देणार आहोत. अर्थात, पक्षाचे दोन पानांचे चिन्ह मिळण्यात आता टीटीव्ही दिनकरन हे कायदेशीर अडथळा आणू शकतात. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपासाठी ही जमेची बाब आहे. कारण अण्णा द्रमुकचे हे दोन गट विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाऊ शकतात. तूर्तास मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तरी पनीरसेल्वम यांची महासचिवपद मिळण्याची इच्छा आहे.

टॅग्स :Indiaभारत