शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : भारत लोकशाहीची जननी; दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:46 IST

Narendra Modi : दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पी-20 परिषद सुरू झाली आहे. या परिषदेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत लोकशाहीची जननी असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. भारताने जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन केले. निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढला आहे. तसेच, दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

पी-20 परिषदेत संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने जी-20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते आणि आता पी-20 चे आयोजन करत आहे. पी-20 शिखर परिषद लोकशाहीची जननी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात 17 सार्वत्रिक निवडणुका आणि 300 हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले 

याचबरोबर, भारत जगात केवळ सर्वाधिक निवडणुकाच घेत नाही तर मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग देखील पहायला मिळतो. 2014 ची निवडणूक इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक होती आणि या निवडणुकीत 60 कोटी लोकांनी भाग घेतला होता. 2019 मध्ये 70 टक्के मतदान झाले आणि 600 हून अधिक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच, भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या चौकटीत भारतीय संसदेद्वारे ही शिखर परिषद आयोजित केली जात आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कॅनडाच्या सिनेटचे अध्यक्ष आले नाहीतविशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पीएमओने म्हटले आहे की, जी-20 सदस्य देशांतील संसदीय वक्त्यांसह, आफ्रिकन युनियन जी-20 मध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पॅन-आफ्रिकन संसदेसारखे आमंत्रित देश सहभागी होत आहेत. दरम्यान, कॅनडाच्या सिनेटचे अध्यक्ष रेमंड गग्ने हे पी-20 शिखर परिषदेला आलेले नाहीत. भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या वादामुळे ते आले नसल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदG20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदी