शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 02:08 IST

संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील मेर‌ठमधील न्यूटीमा हॉस्पिटलमध्ये रविवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडून पाच रुग्णांच्या मृत्यू झाला

बंगळुरू/मेरठ/भोपाळ  : कर्नाटकमधील चामराजनगर येथे जिल्हा रुग्णालयात गेल्या चोवीस तासांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली. त्यात काही कोरोना रुग्णही आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

उत्तर प्रदेशातील मेर‌ठमधील न्यूटीमा हॉस्पिटलमध्ये रविवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडून पाच रुग्णांच्या मृत्यू झाला तसेच मध्य प्रदेशमधील बारवाणी जिल्हा रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजनअभावी चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. चामराजनगर येथे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर जमून जोरदार निदर्शने केली. तर मेरठमध्ये डॉक्टरांचे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जोरदार तोडफोड  केली. चामराजनगरचे पालकमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा तुटवडा रविवारी फक्त रात्री १२.३० ते २.३० दरम्यान झाला होता. त्यामुळे सर्व २४ रुग्ण ऑक्सिजनच्या टंचाईमुळे मरण पावले असण्याची शक्यता नाही.  (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूbangalore-central-pcबंगलोर सेंट्रल