शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिपायाजवळ सापडली 10 कोटींची अवैध संपत्ती, 18 प्लॉट्सचा होता मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 21:56 IST

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधल्या वाहतूक विभागातील शिपायाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नेल्लोर येथून अटक केली.

अमरावती- आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधल्या वाहतूक विभागातील शिपायाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नेल्लोर येथून अटक केली. या शिपायाजवळ 10 कोटींची अवैध मालमत्ता सापडली आहे. 55 वर्षीय के. नरसिम्हा रेड्डी हा नेल्लोरमध्ये उपपरिवहन आयुक्तांच्या कार्यालयात शिपायाचं काम करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं 18वा जमिनीचा प्लॉट घेतला, त्यावेळीच एसीबीनं त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. प्रतिमहिना 40 हजारांहून कमी पगार घेणा-या शिपायानं एवढी मालमत्ता जमवल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागही त्याच्या मागावर होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याच्या दुमजली घरात छापा मारला.या छाप्यात एसीबीला सोने आणि हि-यांसह कोट्यवधी रुपयांचे दागिने सापडले. एसीबीनं जवळपास सहा जागी छापेमारी केली. छापेमारीत एसीबीला दोन किलो सोने, सात किलो चांदी, 7.70 लाख रुपये रोकड, 50 एकरांहून अधिक जमीन, 17 दुकानांसह एका पेंटहाऊसची माहिती मिळाली. या शिपायाचा महिन्याकाठी पगार फक्त 40 हजार रुपये होता. छापेमारीत सापडलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीनं एसीबी संभ्रमात पडली आहे.तसेच आरोपीनं एक कोटीची जीवन विमा पॉलिसी काढली असून, त्याच्याकडे 10 लाख आणि 20 लाखांच्याही एलआयसीच्या पॉलिसीही आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, नरसिम्हा रेड्डी हा 22 ऑक्टोबर 1984पासून डीटीसी ऑफिसमध्ये शिपायाचं काम करतो. गेल्या 34 वर्षांत कोणतीही पदोन्नती न घेता तो या पदावर काम करतोय. 1984मध्ये नरसिम्हा याचा पगार प्रतिमहिना 650 रुपये होता. एसीबीच्या माहितीनुसार, 1992पासून त्यानं प्लॉट खरेदी करणं सुरू केलं होतं आणि स्वतः 3300 स्क्वेअर फुटांच्या दुमजली बिल्डिंगमध्ये तो राहत होता. त्याचे 18 प्लॉट्स आणि शेती पकडून जवळपास 10 कोटींची संपत्ती असू शकतो. रेड्डी याला लाच स्वीकारायची सवय लागल्यामुळे त्यानं पदोन्नतीही नाकारली होती. रेड्डीनं 1992पासून नेल्लोरच्या ग्रामीण मंडळातील भूखंडांची खरेदी सुरू केली होती. गेल्या 10 वर्षांत त्यानं एवढी मालमत्ता जमवली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग