शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आमच्याहून जास्त बायका हिंदूंच्या, सर्व्हे करून पाहा- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 07:31 IST

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या बायका जास्त असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

नवी दिल्ली- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या बायका जास्त असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी या प्रकरणात मोदी सरकारला सर्व्हे करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे.सोशल मीडियावर असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी कोणाच्या बायका जास्त आहेत, यासंदर्भात मोदींना सर्व्हे करण्याचं आव्हान केलं आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही जास्त निकाह करत असून, मुस्लिमांच्या जास्त बायका असतात, असा आरोप केला जातो. 1960 आणि 61च्या वर्षात एक सर्व्हे झाला होता. सर्व्हेतून मुस्लिमांच्या पत्नी कमी, तर इतरांच्या पत्नी जास्त असल्याचं समोर आलं होतं. मी आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो की, हिंमत असल्यास त्यांनी सर्व्हे करावा, त्यातून सर्वकाही समोर येईल.आम्ही इकडे एका पत्नीमुळेच त्रासलेले आहोत. तर दुस-यांकडे दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि बॉसजवळ तर एकच आहे, परंतु तो घरीच नसतो. ज्यांच्याजवळ एकच पत्नी आहे आणि ते दिल्लीत जाऊन बसले आहेत. आम्ही पुष्कळ लग्न करतो, असं बोललं जातं, परंतु त्यात काही तथ्य असल्यास उघड करावं. फक्त तोंडाच्या वाफा न दवडता आम्हाला आकडे द्या, सर्व्हे करा, असंही मोदी सरकारला आव्हान करत असल्याचंही ओवैसी म्हणाले आहेत. हा सर्व्हे समुदायाच्या आधारावर व्हायला हवा, तसेच या सर्व्हेमध्ये ठेवलेल्या बायकांचाही उल्लेख असायला हवा, असंही ओवैसी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHinduहिंदूMuslimमुस्लीम