शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करणाऱ्यास आमदार पुत्राने ठार मारले

By admin | Updated: May 9, 2016 04:24 IST

संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याने कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार केले.

गया : संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याने कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार केले. बिहारच्या गया येथे पोलीसलाईनजवळ ही घटना घडल्यानंतर या भागात नागरिकांनी जोरदार निषेध करीत रॉकीच्या अटकेची मागणी केली आहे.विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या मनोरमादेवी यांचे पती बिंदेश्वरीप्रसाद यादव ऊर्फ बिंदी यादव आणि त्यांचा सुरक्षा रक्षक राजेश कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. रॉकी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या कारला २० वर्षीय आदित्यकुमार सचदेवा आणि त्याच्या चार मित्रांच्या कारने ओव्हरटेक केले होते. त्यानंतर रॉकीने या कारला रोखत गोळ्या झाडल्या. रॉकी कारमधील सहकाऱ्यांसोबत फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे.हत्येला राजकीय रंग आदित्यकुमार याला अनुराग नारायण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रॉकीच्या निवासस्थानी बंदुकीच्या फैरी आणि कार्बाईन आढळून आले. दरम्यान या घटनेला राजकीय वळण लाभले आहे. विरोधी पक्षनेते प्रेमकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत मोठ्या जमावाला संबोधित केल्यानंतर लोकांनी रॉकीच्या अटकेची मागणी करीत महावीर पुलावर वाहतूक रोखत निदर्शने केली. बिंदेश्वरी प्रसाद यादव यांना यापूर्वी २०११ मध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा बाळगल्याबद्दल अटक केली होती. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)