शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जादा सामान पकडले गेल्यास लागणार सहापट लगेज चार्ज! रेल्वेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:16 IST

दरवर्षी सुटीनिमित्त सहकुटुंब कुठेतरी जाणे होतेच. रेल्वे प्रवासात तर जो-तो सोबत बरेच सामान घेऊन निघतो. जादा सामानासाठी लागणाऱ्या लगेज चार्जबाबत कुणी फार गंभीरपणे विचार करीत नसते.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : दरवर्षी सुटीनिमित्त सहकुटुंब कुठेतरी जाणे होतेच. रेल्वे प्रवासात तर जो-तो सोबत बरेच सामान घेऊन निघतो. जादा सामानासाठी लागणाऱ्या लगेज चार्जबाबत कुणी फार गंभीरपणे विचार करीत नसते. परंतु यापुढे प्रवासात असा बिनधास्तपणा केला तर अंगाशी येऊ शकते. तुमच्याजवळ दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान जर आढळले तर रेल्वे प्रवाशाकडून त्यावर सहापट लगेज चार्ज आकारणार आहे.खरे तर यासाठी रेल्वेने कोणताही नवा नियम तयार केलेला नाही. परंतु मर्यादेपेक्षा जादा सामान आणणाºया प्रवाशांमुळे त्रस्त झालेल्यांकडून रेल्वेकडे असंख्य तक्रारी आल्याने रेल्वेला आपल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. जादा सामानावर दंड आकारण्याबाबत रेल्वेने ३० वर्षांपूर्वीच कायदा केलेला आहे. त्यानुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा सोबत आणलेल्या जादा सामानावर सहापट लगेज चार्ज लावला जाणार आहे.काय आहे कायदा?प्रचलित कायद्यानुसारस्लीपर क्लासमधून जाणाºया प्रवाशाला सोबत ४० किलो तर दुसºया वर्गातून जाणाºयास ३५ किलोचे सामान सोबत घेता येते. यासाठी त्यांना कोणताही लगेज चार्ज द्यावा लागत नाही.तसेच स्लीपर क्लासमधून सोबत जास्तीत जास्त ८० किलो तर दुसºया वर्गातून ७० किलो सामान अधिक चार्ज भरल्यानंतर घेता येते. हे अधिकचे सामान मालडब्ब्यात ठेवावे लागते. ही माहिती रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी संचालक वेद प्रकाश यांनी दिली.पेटी वा सुटकेस ठरलेल्या आकाराचीच असावीसामान पॅक करण्यासाठी वापरली जाणारी पेटी, सुटकेस किंवा बॉक्सचा आकारही रेल्वेने ठरवून दिला आहे. याची लांबी, रुंदी आणि उंची १०० ७ ६० ७ २५ सेंटीमीटर या प्रमाणात असावी, असे सांगण्यात आले आहे. बॉक्सचा आकार कोणत्याही प्रकारे दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यासाठी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे