शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवमधल्या राजकीय संकटावर मोदी आणि ट्रम्पमध्ये 'फोन पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 09:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये मालदीव, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली.

ठळक मुद्देट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये झालेली या वर्षातील ही पहिली चर्चा आहे. अफगाणिस्तानात सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये मालदीव, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मालदीवमधल्या राजकीय संकटाबद्दल चिंता व्यक्त करतानाच कायद्याचे राज्य आणि लोकशाही मुल्यांचे महत्व अधोरेखित केले असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. 

ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये झालेली या वर्षातील ही पहिली चर्चा आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा सहकार्य आणि समृद्धतेसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानात सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. म्यानमार आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या विषयावरही दोघांमध्ये चर्चा झाली. 

सध्याच्या घडीला 6 लाख 80 हजार रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशमध्ये असून त्यांच्यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या परतीसाठी नुकताच बांगलादेश आणि म्यानमारमध्ये एक करार झाला आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या म्यानमारमध्ये परतीची ही योग्य वेळ नाही असे अमेरिकेचे मत आहे. उत्तर कोरियाला अणवस्त्ररहित करण्यासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  

काय आहे मालदीवचे संकट राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. मालदीवमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. यामुळे सरकारला कोणालाही अटक करण्याचे, छापा मारण्याचे आणि संपत्ती जप्त करण्याचे अधिकार मिळाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आणि लोकप्रतिनिधींची पुन:नियुक्ती  करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांवरील खटले चुकीचे आणि राजकीय हेतून प्रेरीत होते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच आदेशावरुन मालदीवमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे.   

मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने भारताने याविषयी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहेत. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमडीपीचे नेते मोहम्मद नाशीद यांनी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाMaldivesमालदीवNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प