शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या पाच वर्षांत दीडपट झाली देशभरातील शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 01:39 IST

केंद्रातील मोदी सरकार भलेही २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी देत असले तरी वास्तविक पाहता या सरकारच्या राजवटीत शेतक-यांवरील बँकांच्या कर्जाचे ओझे वर्षागणिक वाढतच चालले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार भलेही २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी देत असले तरी वास्तविक पाहता या सरकारच्या राजवटीत शेतक-यांवरील बँकांच्या कर्जाचे ओझे वर्षागणिक वाढतच चालले आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकºयांवरील बँकांची थकबाकी दीडपट झाली आहे.वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशभरातील शेतकºयांवर बँकांचे १४.५३ लाख कोटींचे कर्ज थकीत होते. ३१ मार्च २०१४ पर्यंत थकबाकीची रक्कम ९.६४ लाख कोटी रुपये होती. ती मार्च २०१५ मध्ये वाढून ११.८५ लाख कोटींवर गेली. मार्च २०१६ मध्ये थकबाकीचा आकडा १२.५९ लाख कोटींवर पोहोचला. मार्च २०१७ मध्ये तर हाच आकडा १४.३६ लाख कोटींवर गेला आहे.उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑासह अनेक राज्यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली होती, तेव्हा शेतकºयांवरील थकीत कर्जाची ही स्थिती आहे.वित्त राज्यमंत्री शुक्ला यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर सर्वाधिक थकबाकी तामिळनाडू (१७.१६ लाख कोटी), महाराष्टÑ (१६.११ लाख कोटी), कर्नाटक (१२.४९ लाख कोटी), आंध्र प्रदेश (११.५६ लाख कोटी) आणि उत्तर प्रदेशातील (११.५२ लाख कोटी) शेतकºयांवर होती. यापैकी महाराष्टÑ आणि उत्तर प्रदेशातील शेतकºयांवरील कर्जाचे ओझे मागच्या एक वर्षात कमी झाले.महाराष्टÑातील शेतकºयांवरील थकबाकी ८० हजार कोटी आणि उत्तर प्रदेशात थकबाी ९.११ लाख कोटींहून अधिक रकमेने कमी झाली. याउलट तामिळनाडूतील शेतकºयांवरील थकबाकीचा आकडा २.८७ लाख कोटी रुपये, कर्नाटकात २८ हजार कोटी आणि आंध्र प्रदेशातील शेतकºयांवरील थकबाकीची रक्कम ४३ हजार कोटी रुपयांनी वाढली.शेतकºयांवर बँकांची सर्वाधिक थकबाकीराज्य २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४तामिळनाडू १७.१६ १४.२९ १३.४२ १२.६ ११.०७महाराष्ट्र १६.११ १६.९१ १६.३४ १८.९१ १०.८२कर्नाटक १२.४९ १२.२१ १२.७३ ८.२३ ७.०२आंध्र प्रदेश ११.५६ ११.१३ १०.१८ ९.७३ ११.९७उत्तर प्रदेश ११.४२ २०.५३ १२.४८ ११.६८ ९.०४देशभर १४५.३१ १४३.६७ १२५.९१ ११८.५८ ९६.४१(रक्कम लाख कोटी रुपयांत)

टॅग्स :Farmerशेतकरी