शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 16:54 IST

फेक फॉलोअर्सच्याबाबतीत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.

नवी दिल्ली: ट्विटरवरील फेक फॉलोअर्ससंदर्भात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला एक अहवाल सोशल मीडियावरील चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या अहवालानुसार जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटरवरील फॉलोअर्स खोटे (फेक) असल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. एवढेच नव्हे तर फेक फॉलोअर्सच्याबाबतीत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला क्रमांक लागत असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यांच्या एकूण फॉलोअर्सपैकी 60 टक्के फॉलोअर्स बनावट असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून एक स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये ट्विटरने संबंधित अहवाल आमचा नसल्याचे म्हटले आहे. बनावट फॉलोअर्स शोधण्यासाठी वापरण्यात आलेले मापन यंत्रणा ट्विटरची नव्हतीच. ट्विटर ऑडिटसाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे या अहवालाला गांभीर्याने घेऊ नये, असे स्पष्टीकरण ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहे. ट्विटरकडून जो अहवाल बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. दींचे ट्विटरवर एकूण चार कोटी फॉलोअर्स आहेत. त्यापैकी तब्बल 2 कोटी 40 लाख फॉलोअर्स बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते मोदींखालोखाल पोप फ्रान्सिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रमप या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. त्यांचे 37 टक्के फॉलोअर्स बनावट असल्याचे ट्विटर ऑडिटमध्ये म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर