शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत जातीची भिंत कोसळली, 400 दलितांनी स्वीकारला इस्लाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 13:35 IST

तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चेन्नईः तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तमीळ पुलिगल काची नावाच्या एक दलित संघटनेनं हा दावा केला आहे. संघटनेच्या माहितीनुसार, 5 जानेवारीनंतर जवळपास 40 कुटुंबीयांचं धर्मांतर करण्यात आलं असून, ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. दलितांनी अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं धर्मांतर करण्याच्या मागे भिंत कोसळल्याचं कारण देण्यात येत आहे, ज्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. दलित ग्रामवासीयांच्या मते, त्यांच्या समुदायाला कमीपणा दाखवण्यासाठी ती भिंत बांधण्यात आली होती.  इस्लाम स्वीकारणाऱ्या दलितांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं की, आमच्या इच्छेनुसार हे धर्मांतर केलं जात आहे. CNN-News18च्या हाती लागलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, गेल्या तीन वर्षांपासून इस्लाम धर्मानं आम्ही प्रेरित होतो. आता मी इस्लामचे धार्मिक कायदे आणि सिद्धांतांच्या कारणास्तव धर्माचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही प्रामाणिकपणे इस्लाम धर्म स्वीकारत आहोत. तसेच स्वेच्छेनं मुस्लिम नावं स्वीकारत आहोत. जे लोक कायद्यानुसार धर्मांतर करत आहेत, त्यांना पोलिसांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण धर्मांतरबाबत उघड उघड बोलत नाहीत. तसेच काही जण धर्म परिवर्तन केल्याचं स्वीकारणास धजावत आहेत. तमीळ पुलिगल काचीच्या सदस्यांनी सांगितलं की, आमच्यासोबत वारंवार भेदभाव, हल्ला आणि अपमान होतो आहे. आम्हाला अस्पृश्य समजलं जात आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश करणं आणि दुसऱ्यांसोबत दुकानात चहा प्यायण्याची परवानगी नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती की, जिल्ह्यात 3,000 लोक जानेवारी 2020पर्यंत इस्लाम धर्म स्वीकारतील. दलितांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील एक वर्ग नाराज आहे.