शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोंग सरोवरात ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 03:03 IST

कांगरा जिल्ह्यातील महाराणा प्रताप सागर सरोवरात (पोंग सरोवर नावाने प्रसिद्ध) ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले.

धर्मशाला (हिमाचल प्रदेश)  - कांगरा जिल्ह्यातील महाराणा प्रताप सागर सरोवरात (पोंग सरोवर नावाने प्रसिद्ध) ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले. या पक्ष्यांची मोजणी दर पंधरा दिवसांनी, तर वार्षिक मोजणी २९ आणि ३० जानेवारी रोजी केली जाते.२९ व ३० जानेवारी रोजी सरोवरात सर्वात जास्त पक्षी असतात, असे मानले जाते, असे हा अधिकारी म्हणाला. कांगरा जिल्ह्यात सिवालिक हिल्सच्या पाणथळ भागात व्यास नदीवर हे सरोवर (पोंग धरण) १९७५ मध्ये मातीचे थर वापरून बांधण्यात आले आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यातच सुमारे ५५ हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. हा सरोवर वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे आणि रामसर परिषदेने भारतात ज्या २७ आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा जाहीर केल्या आहेत त्यात पोंग सरोवराचा समावेश आहे.येथे आॅक्टोबरमध्येच पक्षी यायला सुरुवात होते व त्यांचा परतीचा प्रवास एप्रिलमध्ये सुरू होतो. यातील बहुसंख्य पक्षी हे सायबेरिया, मध्य आशिया आणि रशियातील असतात. येथे शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती असल्या तरी बार हेडेड गीझ (मोठ्या आकाराच्या बदकासारखा लांब मानेचा पक्षी) मुबलक प्रमाणात असल्याचे अधिका-याने सांगितले. या स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पुरेशा संख्येत कर्मचारी वर्ग नेमला आहे. वन संरक्षकांच्या साह्यासाठी शिकारविरोधी तुकडीही दिली आहे.हा अधिकारी म्हणाला की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सरोवर परिसरात बेकायदा पिके घेणाऱ्यांना रोखण्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. आम्ही आमच्या सुखनादा कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेआहेत. (वृत्तसंस्था)२४ हजार ५२९हेक्टर्सवर हा सरोवर पसरला असून, त्याचा पाणथळीचा भाग १५ हजार ६६२ हेक्टर्स आहे.२०१७-२०१८ वर्षात१.२७ लाख पक्ष्यांनी भेट दिली होती. गेल्या वर्षी या सरोवरात १.१० लाख पक्षी आले होते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यHimachal Pradeshहिमाचल प्रदेश