Outposts of protesters outside the Strongroom | स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांची चौकीदारी
स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांची चौकीदारी

मेरठ - गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. सुरवातीपासूनच ईव्हीएमच्या सुरक्षाव्यवस्था विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांनी आपले कार्यकर्ते तैनात केले आहे. एवढच नाही तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून दुर्बिणीतून लक्ष ठेवण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी सीसीटीव्ही बसवले आहे. तर, दिवस रात्र स्ट्रॉंग रूमची चौकीदारी करताना उमेदवार दिसत आहे.

 

१९ रोजी सातव्या आणि शेवटचा टप्प्यात मतदान पार पडले. त्यांनतर २३ रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत देशातील सर्वच ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंगरूममध्ये वण्यात आल्या आहे. दुसरीकडे मात्र, ईव्हीएम मशीनची अदलाबदल होण्याच्या भीतीने बऱ्याच ठिकाणी उमदेवार आणि  कार्यकर्ते चक्क स्ट्रांगरूमच्या बाहेर तळ ठोकून आहे. 24 तास हे कार्यकर्ते स्ट्रॉंगरूमवर  ठेवून आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये सपा-बसपा कार्यकर्ते चक्क दुर्बिणीचा वापरकरून ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवून आहे. एवढच नही तर, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता इव्हीएममध्ये आफरातफरीचे आरोप सुरू झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दिवस-रात्र तळ ठोकून बसले असल्याचे दिसून येत आहे.तर निवडणूक आयोगाने इव्हीएम बाबत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहे.


Web Title: Outposts of protesters outside the Strongroom
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.