एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आउटबाउंड कार्यक्रम
By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST
नाशिक : भुजबळ नॉलेजसिटी येथील एमबीएच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आउटबाउंड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून व्यवस्थापनाची अनुभूती घेतली. यात विद्यार्थ्यांमध्ये शहरापासून दूर निसर्गरम्य स्थळी विविध मॅनेजमेंट गेम्सच्या माध्यमातून व्यवस्थापनातील संघ भावना, नेतृत्व गुण, वेळेचे व्यवस्थापन, नियोजन, दूरदृष्टी, स्वयंशिस्त,सुसंवाद, खेळाडू वृत्ती, ध्येय निश्चिती, समन्वय यांसारखे गुण रुजविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ व मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.
एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आउटबाउंड कार्यक्रम
नाशिक : भुजबळ नॉलेजसिटी येथील एमबीएच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आउटबाउंड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून व्यवस्थापनाची अनुभूती घेतली. यात विद्यार्थ्यांमध्ये शहरापासून दूर निसर्गरम्य स्थळी विविध मॅनेजमेंट गेम्सच्या माध्यमातून व्यवस्थापनातील संघ भावना, नेतृत्व गुण, वेळेचे व्यवस्थापन, नियोजन, दूरदृष्टी, स्वयंशिस्त,सुसंवाद, खेळाडू वृत्ती, ध्येय निश्चिती, समन्वय यांसारखे गुण रुजविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ व मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. फोटो कॅप्शन : मेट, भुजबळ नॉलेज सिटी इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंटच्या आउटबाउंड कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक.