शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या तुलनेत आमचे काम दसपट , केजरीवालांचे अमित शहांना खुल्या चर्चेचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:24 IST

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पूर्वांचलच्या विकासासाठी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये मांडला. अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांच्या या दाव्यांना दिल्लीच्या राजकारणाशी जोडले आहे.

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पूर्वांचलच्या विकासासाठी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये मांडला. अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांच्या या दाव्यांना दिल्लीच्या राजकारणाशी जोडले आहे.काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी दिला होता. मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला. याच मुद्याचा आधार घेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहांना विचारला. दिल्लीमधेही पूर्वांचलचे लोक राहतात. मग त्यांच्या विकासासाठी पैसे का नाही देत? दिल्लीमध्ये राहणाऱ्या पूर्वांचलच्या लोकांसोबत भेदभाव का, असा प्रश्नही केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरुन विचारला.केजरीवाल केवळ इथेच थांबले नाहीत, तर गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने केलेली कामे आणि दिल्ली सरकारने केलेली कामे यांची तुलना करणारी चर्चा रामलीला मैदानावर होऊन जाऊ दे, असे आव्हानही त्यांनी भाजप अध्यक्षांना दिले. पूर्वांचल महाकुंभच्या निमित्ताने अमित शाह यांच्या एका विधानाच्या हवाल्याने भाजपच्या टिष्ट्वटर हँडलवरुन केलेल्या एका टिष्ट्वटचा संदर्भ या आव्हानाला होता.‘केजरीवालजी, या चार वर्षांत तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे टिष्ट्वट भाजपने केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला. या कामांची प्रशंसा जागतिक स्तरावरही होत असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींनी जेवढे काम चार वर्षांत केले, त्याच्या दसपट काम आम्ही केले आहे. आमच्याकडून एकही चुकीचे काम झाले नाही असा विश्वास व्यक्त करून केजरीवालांनी रामलीला मैदानावर या संदर्भात दिल्लीकरांसोबत एक खुली चर्चा होऊ दे असे आव्हान भाजपला दिले.दिल्लीमध्ये असलेली पूर्वांचलच्या मतदारांची संख्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपने ‘पूर्वांचल महाकुंभ’चे आयोजन केले होते. केजरीवालांनाही या मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून आपल्या पक्षाचीही भूमिका टिष्ट्वटरच्या माध्यमातून मांडली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी