शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:18 IST

आम्ही राज्यात भाजपा-शिवसेना युतीमध्ये असूनही आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरे आहे. आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा.

- संजीव साबडे।मुंबई : आम्ही राज्यात भाजपा-शिवसेना युतीमध्ये असूनही आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरे आहे. आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. पण त्यासाठी आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रमुख व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘लोकमत’ च्या मुलाखतीत केले.

तुमचा पक्ष राष्ट्रीय असल्याचे तुम्ही सांगता, पण देशात लोकसभेची एकही जागा का लढवत नाही?हे खरे आहे. आमच्यामुळे उत्तर प्रदेशात १३ टक्के दलितांची मते मिळाली होती आणि आताही मिळतील. अनेक राज्यांत आमच्यामुळे रालोआ व भाजपाचा फायदा झाला आहे. पण आमचा यंदा एकही उमेदवार नाही, हेही खरे आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीमशक्ती यांना एकत्र आणले. त्याचा फायदा राज्यात युतीला झालाच. शिवसेनेने आम्हाला दक्षिण मुंबईची जागा द्यायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी त्याग करायला हवा होता. तेथून मी निवडून आलो असतो. आता किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबईची जागा आम्हाला द्यावी, असा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले त्याबाबत बोलणे झाले आहे. काय होते ते पाहू. ईशान्य मुंबईतून मी स्वत: लढलोहोतो. त्यावेळी सव्वादोन लाख मते मिळवली होती.भाजपाने ती जागा सोडली नाही तर?ती जागा मिळेलच, असे नाही. पण त्यामुळे आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही. भाजपाच्या कमळ या निवडणूक चिन्हावर आमचा उमेदवार लढणार नाही, असे आम्ही स्पष्ट केले होते. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी अधिक जागा आम्ही मागू. विधान परिषदेवरही आमच्या कार्यकर्त्यांना स्थान हवे, असे आमचे म्हणणे आहे. राज्यसभेवरही आम्हाला स्थान हवे. देशात पुन्हा रालोआचे, मोदींचेच सरकार येणार आहे. त्यावेळी स्वतंत्र खात्याचा कारभार असलेले राज्यमंत्रीपद मला मिळावे, असे आमचे म्हणणे आहे.तुम्हाला कायम पद मिळते. पण कार्यकर्त्यांचे काय? त्यांच्यावर अन्यायच होतो.सत्तेत आम्हाला पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरेच. पण महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला मिळाले आहे. तसेच राज्यात व मुंबईत अनेक कार्यकर्त्यांच्या एसईओपदी नेमणुका झाल्या आहेत. अनेक महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्या तीन वर्र्षासाठी आहेत. शिवाय मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा आमच्या मागणीप्रमाणे पुन्हा कडक केला. समाजकल्याण खात्याच्या अर्थसंकल्पात भरीव वाढ करण्यात आली. अनेकांना घरे मिळाली, शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा झाले. अनेक घरात गॅस कनेक्शन्स आली. त्याचा सर्वाधिक फायदा दलित व वंचित यांनाच झाला आहे. मोदी यांनी इतकी कामे केल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा वा वेगळा विचार करण्याची गरजच नाही.तुम्ही व प्रकाश आंबेडकर राज्यात युतीलाच मदत करत आहात की काय?आम्ही युतीमध्ये आहोत. त्यामुळे आमचा शिवसेना-भाजपा यांना उघड पाठिंबा आहे. पण प्रकाश आंबेडकरही छुप्या पद्धतीने युतीलाच मदत करणारी भूमिका घेत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक