शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमची कोव्हॅक्सिन लस २०० टक्के सुरक्षित; सीरमचे नाव न घेता भारत बायोटेकचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:00 IST

Corona Vaccination : कोव्हॅक्सिनचे दोन कोटी डोस तयार आहेत. वैद्यकीय चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असे केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद आहे.

हैदराबाद : आम्ही विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस २०० टक्के सुरक्षित आहे. आमच्यावर कोणी संशय घेऊ शकत नाही’, असे ठाम प्रतिपादन केले आहे भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी.

कोरोनावरील उपचारासाठी औषध महानियंत्रकांनी रविवारी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिली. मात्र, त्यातील कोव्हॅक्सिन लसीच्या मंजुरीवर अनेकांनी आक्षेप घेतला. कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष अद्याप जाहीर झाले नसताना लसीला मंजुरी कशी दिली, असा प्रश्न निर्माण उपस्थित झाला. त्यातच दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सिन ही पर्यायी लस असेल, असे स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. कृष्णा इल्ला यांनी सोमवारी कंपनी आणि लसीबाबत सविस्तर भूमिका मांडली.

डॉ. इल्ला म्हणाले, ‘कमी पैशांतही आम्ही संशोधक देशात लसी विकसित करत आहोत. अन्यांनी मात्र इतर देशांनी संशोधन केलेली लस या ठिकाणी विकसित केली आहे. आमच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आम्ही लवकरच जाहीर करू. आम्हाला आमचा डेटा उघड करण्यासाठी १४६ बाधितांची गरज आहे. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर हा डेटा उघड करण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. परिणामकारकतेसंदर्भातील कोणताही हंगामी डेटा अद्याप सादर करण्यात आलेला नाही. आम्ही आतापर्यंत १६ लसी विकसित केल्या असल्याने आम्हाला कोणीही अननुभवी म्हणून हिणवू नये. आमची कंपनी भारतीय असली तरी जागतिक दर्जाची आहे.’

निर्णायक लसटायफॉइडवर आम्ही विकसित केलेली लस डब्ल्ययूएचओने निर्णायक लस म्हणून घोषित केली होती, असे सांगत डॉ. इल्ला यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आमचा रेकॉर्ड उत्तम आहे. ७० जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, असे नमूद करत त्यांनी सीरमचे नाव न घेता टोला लगावला.

१०% दुष्परिणामकोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांमध्ये फक्त १० टक्के लोकांमध्येच दुष्परिणाम आढळून आले. इतरांच्या चाचण्यांमध्ये ६० ते ७०% लोकांना दुष्परिणाम जाणवले. दुष्परिणाम झाकण्यासाठी ॲस्ट्राझेनेका ४ ग्रॅम पॅरासिटामॉल देत होते.

१००० जणांचा डेटाआमच्याकडे १००० लोकांचा रोगप्रतिकार शक्तीचा डेटा उपलब्ध आहे. इतरांनी फक्त १०० लोकांचाच डेटा सादर केल्याचे डॉ. इल्ला यांनी सीरमचे नाव न घेता सांगितले. अमेरिका व युरोपात ऑक्सफर्डचा डेटा स्वीकारण्यास नकार दिला असताना आपल्याकडे त्यांची लस मंजूर झाली. 

२ कोटी डोस तयारकोव्हॅक्सिनचे दोन कोटी डोस तयार आहेत. वैद्यकीय चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असे केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या