शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"आपला देश अधिक बलशाली झाला..."; भारताच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरील टीकेला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 21:46 IST

संरक्षण संपादन परिषदेने (DAC) या महिन्याच्या सुरुवातीला ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण व्यवहार मानला जात आहे.

राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरून होणारी टीका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेटाळून लावली आहे. तसेच, "या संरक्षण करारामुळे भारत अधिक बलशाली झाला आहे. आम्ही राफेलमधील स्वदेशी उपकरणांचे प्रमाण सातत्याने वाढवत आहोत. ही प्रक्रिया कंपनी आणि भारत सरकार यांच्यातील चर्चेचा भाग आहे. यावर टीका होण्याचे कारण नाही, कारण यामुळे भारताचेच सामर्थ्य वाढते. आपले धोरणात्मक संबंध सुधारतात आणि भारतात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतात," असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मॅक्रॉन यांनी, दोन्ही देशांमधील संबंधांचा 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' म्हणून उल्लेख केला. 

मॅक्रॉन म्हणाले, भारताने नुकतीच राफेल विमानांसाठी नवीन ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "राफेलवर, आम्हाला पुढे जायचे आहे. काही दिवसांपूर्वी, भारताने ११४ नवीन राफेल विमानांची एक नवीन बॅच ऑर्डर करण्याची आणि त्यांचे एकत्रित उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली. 'मेक इन इंडिया' हा या नवीन ऑर्डरचा एक महत्त्वाचा घटक असेल," असेही त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, विद्यमान सहकार्य बळकट होण्याच्या दृष्टीने हे एक नवीन पाऊल आहे, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार? DAC चीही मंजुरी -संरक्षण संपादन परिषदेने (DAC) या महिन्याच्या सुरुवातीला ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण व्यवहार मानला जात आहे.

भारतीय वायुसेनेच्या दृष्टीने महत्वाचा सौदा -भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्वाचा ठरेल. रशिया आणि अमेरिकेने प्रत्येकी Su-57 आणि F-35 सारखी पाचव्या पिढीतील विमाने ऑफर केली होती. मात्र, भारताने राफेलवरच विश्वास ठेवला. भारताने १८० स्वदेशी 'तेजस Mark-1A' विमानांची ऑर्डर दिली आहे. मात्र, इंजिन पुरवठ्यातील विलंबामुळे त्यांच्या डिलिव्हरीला वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत हवाई दलातील विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी राफेल डील महत्त्वाची मानली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India strengthens with Rafale deal: Macron defends, eyes new orders.

Web Summary : Macron defends the Rafale deal, emphasizing India's increased strength and strategic partnership. India considers ordering 114 more Rafales, with a focus on 'Make in India'. The DAC approved the deal, crucial for the Indian Air Force's capabilities.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सRafale Dealराफेल डील