शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

केजरीवालांच्या अटकेविरुद्ध आपचा सामूहिक उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 05:55 IST

देश-विदेशात केले शक्तिप्रदर्शन; आपला संपविण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : ‘जेल के ताले तुटेंगे, अरविंद केजरीवाल छुटेंगे,’ अशी घोषणा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी सत्ताधारी आपच्या समर्थकांनी देशभरात तसेच जगभरात अनेक ठिकाणी सामूहिक उपवासाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत केंद्रातील सरकारविरुद्ध निषेध आंदोलन छेडले. गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे  ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांनी भाजपविरुद्ध काहीही पाहणार नाही, ऐकणार नाही आणि बोलणार नसल्याचे ठरवून टाकले आहे, अशी टीका आप नेते जस्मीन शहा यांनी केली. 

दिवसभर सामूहिक उपवासाचे आंदोलन करीत आपने केंद्रावरील दबाव कायम ठेवला. गेल्या २१ मार्चपासून तुरुंगात अटकेत असलेले केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या समर्थकांना रविवारी सामूहिक ठेवण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने केले होते. या आवाहनांतर्गत आपचे कार्यकर्ते सामूहिक उपवासावर गेले.

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी उपवासआम आदमी पार्टी कट्टर बेईमान असून, भ्रष्टांना पाठीशी घालण्यासाठी सामूहिक उपवास करीत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपनेही आज दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली पालिका बाजारासह ठिकठिकाणी ‘शराब से शीशमहल’ अशा घोषणा देत धरणेे दिले.

कारस्थान का रचले?ईडीच्या मनी लाँड्रिंग आरोपात तिहार तुरुंगात सहा महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर जामिनावर सुटलेले संजय सिंह यांनी केंद्र सरकारचा आक्रमक शब्दात समाचार घेतला. सिसोदिया, संजय सिंह आणि केजरीवाल यांनी घोटाळे केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली असे भाजप नेते म्हणत होते. पण, आता वस्तुस्थिती समोर येत असून, आपला संपविण्यासाठीच भाजपने हे कारस्थान रचल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी केला. अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप लावून आता त्यांचाच बचाव करणार्यांचे दुटप्पी व्यक्तिमत्त्व उघड झाले आहे, अशी टीका राय यांनी केली. यावेळी सर्वच नेत्यांनी  भाजपच्या हुकूमशाही कारभारावर कोरडे ओढले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल