शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एखाद दुसरा सोडल्यास इतर मुगल अय्याश होते- शिया वक्फ बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 17:47 IST

ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं असतानाच आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही एक वक्तव्य केलं आहे.

लखनऊ- ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं असतानाच आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही एक वक्तव्य केलं आहे. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक होऊ शकतं. परंतु पूजेचं ठिकाण नाही. एखाद दुसरा सोडल्यास जास्त करून मुगल हे अय्याश होते,  मुस्लिम त्यांना आदर्श समजत नव्हते, असं शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले होते.तसेच अयोध्येत राम मंदिर पुनर्निर्माणाला विरोध करणं हे दुःखद आहे. राम मंदिर उभारणं हे चांगलं काम आहे. कारण अयोध्या हे हिंदूंच्या वारशाचं केंद्र आहे. मायावती ज्यावेळी स्वतःचा पुतळा बनवत होत्या, त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. परंतु राम मंदिर निर्माणाला एवढा विरोध का होतोय, हे मला समजत नाहीये. सरकारला अयोध्येत भगवान रामाची मूर्ती उभारायची असेल तर आम्ही नक्कीच जमीन देऊ, असंही वसीम रिझवी म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून रामाच्या मूर्तीच्या निर्माणासाठी 10 चांदीचे बाणही देणार आहेत. 

भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरू झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली होती. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश व भारतातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे, असे संगीत सोम म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एक प्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक होती. योगी 26 ऑक्टोबरला आग्र्याचा दौरा करू शकतात. त्यावेळी ते ताजमहाल आणि अन्य स्थळांना भेट देतील. आग्र्याशी संबंधित 175 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती राज्यांच्या पर्यटन विभागाशी संबंधित असलेल्या अवनिश अवस्थी यांनी दिली होती. ताजमहाल एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे येणा-या पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. त्यासाठी आम्ही 370 कोटींची योजना आखली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ