शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मध्य प्रदेशातही मदरशांमध्ये 15 ऑगस्टला तिरंगा फडकवण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 08:46 IST

उत्तर प्रदेशपाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनंही राज्यांतील मदरशांमध्ये नवीन फर्मान जारी केला आहे. मध्य प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील 5 हजार मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत.

भोपाळ, दि. 12 - उत्तर प्रदेशपाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनंही राज्यांतील मदरशांमध्ये नवीन फर्मान जारी केला आहे. मध्य प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील 5 हजार मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय तिरंगा रॅलीचेही आयोजन करुन या कार्यक्रमाची छायाचित्रं संबंधित विभागाला ई-मेलद्वारे पाठवण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.  

मध्य प्रदेशातील मदरशांमध्ये सरकारकडून अशा पद्धतीचे आदेश देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्य प्रदेश मदरसा बोर्डचे अध्यक्ष सय्यद इमादउद्दीन यांनी सांगितले की, ''राज्यातील सर्व मदरशांमध्ये 15 ऑगस्टनिमित्त तिरंगा फडकवल्याची छायाचित्रं आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांचीही छायाचित्रं संबंधित विभागांना पाठवावी लागणार आहेत. राज्यातील सर्व मदरशांना अशाप्रकारचे आदेश देण्यात आले आहेत''. 

मदरशांनी 15 ऑगस्टला 'तिरंगा' फडकवावा - योगी सरकारचा आदेश

उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षा परिषदेने त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले आहेत. 15 ऑगस्टला भारत 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मदरशा शिक्षा परिषदेने परिपत्रक जारी केले असून, त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

मदरशांना प्रथमच स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मदरशांना ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले होते. स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये होणा-या कार्यक्रमांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश आहेत. उत्तर प्रदेशात मदरसा परिषदेने 8 हजार मदरशांना मान्यता दिली आहे. यातील 560 मदरशांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. 

ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन  सकाळी आठ वाजता घेण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई देण्यात येईल. परिषदेने राष्ट्रगीत हिंदी आणि ऊर्दू दोन्ही भाषांमध्ये पाठवले आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयावरुन उत्तर प्रदेशात मोठा गहजब होण्याची शक्यता आहे.