कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या एका निष्पाप तरुणीला सहा नराधमांनी आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. पीडितेचे अपहरण करून तिला ओलीस ठेवले आणि रात्रभर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. ही घटना पूर्णियातील डगरूआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पूर्णियातील नेवलाल चौकातून पायी घरी परतत असताना कारमधून आलेल्या सहा तरुणांनी तिला अडवले. तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिला बळजबरीने कारमध्ये ओढले आणि तिचे तोंड दाबून तिला २५ किलोमीटर दूर बरियार चौकातील एका खोलीत नेले. तिथे नराधमांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर सहा जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
या भयानक परिस्थितीतही पीडितेने कमालीचे धाडस दाखवले. अत्याचारांनंतर मुख्य आरोपी मोहम्मद जुनैद दारूच्या नशेत झोपी गेला. हीच संधी साधून पीडितेने जुनैदचा मोबाईल घेतला आणि '११२' या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना आपल्या लोकेशनची माहिती दिली. माहिती मिळताच डगरूआ पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि लोकेशनच्या आधारे 'जया ट्रेडर्स' या ठिकाणी पोहोचले. खोली बाहेरून बंद होती. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिथे मन हेलावणारे दृश्य दिसली. पीडिता अत्यंत गंभीर आणि विवस्त्र अवस्थेत पडली होती. तर, आरोपी जुनैद शेजारीच झोपला होता. पोलिसांनी तातडीने जुनैदला अटक केली असून इतर ५ आरोपींचा शोध सुरू आहे.
पीडिताची प्रकृती चिंताजनक
पीडितेवर सध्या पूर्णिया मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्युशी झुंज देत आहे. कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या तरुणीचे आयुष्य या सहा क्रूर नराधमांनी उद्ध्वस्त केले आहे.
Web Summary : In Purnia, Bihar, six men abducted a young orchestra worker, forcibly drugged her, and subjected her to gang rape. The victim bravely alerted police, leading to one arrest. Her condition is critical.
Web Summary : बिहार के पूर्णिया में ऑर्केस्ट्रा में काम करने वाली युवती का अपहरण कर छह लोगों ने सामूहिक बलात्कार किया। पीड़िता ने बहादुरी से पुलिस को सूचना दी, जिससे एक गिरफ्तारी हुई। हालत गंभीर है।