शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:57 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत

हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत की, उपसभापतीपद हे राज्यसभेतील विरोधी पक्षातील एखाद्या सदस्यास दिले जावे. विद्यमान उपसभापती पी.जे कुरीयन हे निवृत्त होत असल्याने ही जागा रिक्त होत आहे.असे समजले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा यांच्यासह पक्षाच्या संसदीय समितीशी यावर विचारविनिमय केला आहे आणि असे संकेत दिले आहेत की, भाजप या पदावर दावा करणार नाही. सत्तारुढ भाजप राज्यसभेत ६९ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस व समविचारी पक्ष राज्यसभेत इच्छित संख्या गाठू शकणार नाहीत. २४४ सदस्यसंख्येच्या सभागृहात भाजपा आणि सहकारी पक्षांकडे १०९ सदस्य आहेत. शरद यादव यांची एक जागा रिक्त आहे. तीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर एनडीएची संख्या ११२ वर पोहचेल. जर बीजेडीने भाजपचा प्रस्ताव स्वीकारला तर ही संख्या ११७ वर जाते. जर टीआरएसही (६) राजी झाले तर हा आकडा १२३ वर जाईल. म्हणजेच एनडीएकडे बहुमत होईल.हे पद बिजू जनता दल किंवा तेलंगणा राष्ट्र समिती वा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला देण्याचा विचार आहे. हे पक्ष भाजपा- काँग्रेसपासून समान अंतर राखून आहेत.भाजपाच्या मते तृणमूलचे ज्येष्ठ नेते शुबेंदू शेखर रॉय हे या पदासाठी सक्षम आहेत.तेलंगणा राष्ट्रीय समिती वा बीजू जनता दल यापैकी कुणीही हे पद स्वीकारले तर भाजपला त्याचा अतिशय आनंद होईल. कारण, अन्य विरोधी पक्ष याला विरोध करु शकणार नाहीत.

टॅग्स :BJPभाजपा