शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 06:38 IST

कामकाज नीट पार पाडण्यासाठी गांधीगिरी; ‘देश विकू नका’चा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नीट पार पडावे यासाठी सहकार्य करा, असे आवाहन करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी एका हातात तिरंगा ध्वज व दुसऱ्या हातात गुलाबपुष्प घेऊन भाजपच्या खासदारांचे स्वागत केले. अदानी प्रकरणासह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हायला हवी, अशीही मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षाचे नेते पायऱ्यांसमोर उभे होते, बहुतेकांनी लहान तिरंगा कार्ड आणि लाल गुलाब घेतले होते. देश विकू नका अशा घोषणांचे फलक काही खासदारांनी हाती घेतले होते. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवनात प्रवेश करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तिरंगा राष्ट्रध्वज दिला. काँग्रेस सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी, काँग्रेस, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व डाव्या पक्षांचे खासदार हे संसद भवनाच्या, मकरद्वार येथील पायऱ्यांसमोर उभे होते व त्यांच्यापैकी बहुतेकांनी हाती तिरंगा राष्ट्रध्वज व लाल गुलाब घेतले होते. 

संसद चालावी ही आमची इच्छा संसदेचे कामकाज चालावे ही आमची इच्छा आहे. मात्र, केंद्र सरकारची अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे यासाठी गांधींनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओब बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गांधींनी सरकारवर टीका केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajnath Singhराजनाथ सिंहlok sabhaलोकसभा