शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जीएसटी' सुधारणांमुळे होणाऱ्या महसूल नुकसानीसाठी भरपाई द्या, विरोधी पक्ष शासित राज्यांची केंद्र सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:59 IST

GST News: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुधारणांमुळे राज्य सरकारांचे सुमारे १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांच्या महसुलांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने भरपाई केंद्र सरकारने राज्यांना द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या ८ राज्यांनी केली आहे.

नवी दिली - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुधारणांमुळे राज्य सरकारांचे सुमारे १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांच्या महसुलांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने भरपाई केंद्र सरकारने राज्यांना द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या ८ राज्यांनी केली आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या ८ राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी हा मुद्दा हाती घेतला असून, येत्या ३ व ४ सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत भरपाईसाठी प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. चैनीच्या व घातक वस्तूंवर ४० टक्के अतिरिक्त कर लावला जावा आणि त्यातून मिळणारा निधी भरपाई म्हणून राज्यांमध्ये वाटला जावा, अशी मागणी विरोधी-शासन असलेल्या राज्यांनी केली आहे.

८ राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर कर्नाटकचे अर्थमंत्री बायरे गौडा यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रस्तावित जीएसटी सुधारणांमुळे राज्याला सध्याच्या वस्तू व सेवा कर महसुलाच्या तुलनेत अंदाजे १५-२० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. जीएसटी महसुलातील २० टक्के घट राज्य सरकारांच्या आर्थिक रचनेवर गंभीर परिणाम करू शकेल. राज्यांना महसूल स्थिर होईपर्यंत ५ वर्षे भरपाई मिळायला हवी, अशी आमची मागणी आहे. गौडा यांनी सांगितले की, जीएसटी व्यवस्था सुरू झाली होती, तेव्हा महसूल तटस्थता दर (आरएनआर) १४.४ टक्के होता.

 

टॅग्स :GSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकार