शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

म्हणून एक्झिट पोलमुळे अस्वस्थ विरोधी पक्षांना ऑस्ट्रेलियातील निकालांमधून दिसतोय आशेचा किरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:14 IST

एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची झोप उडवली आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए भरभक्कम संख्याबळासह सत्तेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणूक नुकतीच पार पडली. तेथील मतदान प्रक्रिया आटोपल्यावर तेथील वृत्तसंस्थांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. त्यापैकी बहुतांश एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षात असलेल्या लेबर पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. मात्र सत्ताधारी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील कंझर्वेटिव्ह पक्षाने दणदणीत विजय मिळवत एक्झिट पोलनी वर्तवलेला अंदाज खोटा ठरवला होता. ऑस्ट्रेलियन संसदेच्या प्रतिनिधी सभेत मॉरिसन यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला 74 तर विरोधी लेबर पक्षाला 66 जागा मिळाल्या. प्रतिनिधी सभेमध्ये बहुमतासाठी 76 जागांची गरज असते. त्यामुळे आता 51 मॉरिसन यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. दरम्यान त्रिशंकू सभागृहाच्या परिस्थितीत आपण आघाडी करून काम करू असे अपक्ष खासदार हेलन हेन्स यांनी सांगितले आहे.  दरम्यान, ऑस्ट्रेलियात उद्भवलेल्या याच परिस्थितीचा आधार घेत विरोधी पक्षांचे नेते 23 मे पर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरून चमत्कारिक निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. 

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल