शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:18 IST

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली.

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली. भाजपने आतापर्यंत १०६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिटे दिल्याबद्दल कार्यकर्त्यांना राग होता, तर काही कार्यकर्त्यांनी जाहीर झालेल्या नावांना न बदलल्यास पक्षाचा पराभव अटळ आहे, असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या मुलाला उमेदवारी न दिल्यास मी राजीनामा देईन, अशी धमकी पाटण येथील भाजपच्या खासदाराने दिली.नांदोद (अनुसूचित जमाती), निकोल, नरोदा, खेरालू आणि अंकलव येथील शेकडो कार्यकर्ते भाजपच्या मुख्यालयावर पोहोचले. नर्मदा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नांदोदचे (अनुसूचित जमाती) विद्यमान आमदार शब्दशरण तडवी यांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल विरोध केला. त्यांची लोकप्रियता लयाला जाऊन अनेक वर्षे झाली, असे नर्मदा जिल्हा भाजपचे चिटणीस करणसिंह परमार म्हणाले. (वृत्तसंस्था)

गेल्या पाच वर्षांत तडवी यांनी मतदारसंघात विकास केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. तडवीच उमेदवार राहणार असतील, तर भाजप नर्मदा जिल्ह्यातून यावेळी नाहीशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पराभव टाळण्यासाठी तडवींना सक्षम उमेदवाराचा पर्याय दिला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना वाटते.>हिमाचल प्रदेशात ५० जागा मिळतीलसिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या किमान ५० जागा आम्ही जिंकू, असा विश्वास राज्याच्या भाजपने रविवारी व्यक्त केला आहे. पक्षाच्या समितीची बैठक हमीरपूर येथे रविवारी झाली. मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा तीत घेतला गेला. ६८ सदस्यांच्या विधानसभेत आम्हाला किमान ५० जागा मिळतील, असे राज्य भाजपचे प्रमुख सतपालसिंग सत्ती यांनी सांगितले. आम्ही मतदानानंतरच्या प्रतिक्रिया, पक्षविरोधी कारवाया यांचा आढावा घेतल्यानंतर ५० जागा जिंकून स्थिर सरकार स्थापन करू शकू, असे सत्ती म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017