शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:28 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

कोलकाता : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठीच विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.खुर्शीद म्हणाले की, काँग्रेसवर मर्यादा येणार नाहीत याची दक्षता विरोधी पक्षांबरोबर आघाडी करताना घेण्यात यावी. अशी आघाडी करताना प्रत्येकाला काही ना काही त्याग करावाच लागेल. तशाच मनोभूमिकेतून विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनात असेल, तर त्यादृष्टीने काँग्रेसला पुढील पाच वर्षे काम करावे लागेल. विरोधी पक्षांच्या आघाडीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यातून एकदम बाहेर पडून पुढची दोन वर्षे स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी काम करायला जाल, तर ते अयोग्य ठरेल. कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याच विचाराने पुढील निवडणुका येईपर्यंत सातत्याने काम करायला हवे. विद्यमान स्थितीत काँग्रेसला आघाडी करण्याची इच्छा असून, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.ते म्हणाले की, देशात सर्व राज्यांत जागा जिंकू शकेल असा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष आपापल्या राज्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. देशातील लोकसभेच्या एकूण जागा व एखाद्या राज्यातील जागा यांच्या वाटपाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये खूपच फरक असतो. जागावाटपामध्ये व्यावहारिक तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. आघाडीत सामील होणाºया विरोधी पक्षांनी हे भान राखायला हवे.>आघाडीच्या स्थापनेत अनेक अडचणीकाँग्रेसने आघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी ते उद्दिष्ट साध्य होण्यात अनेक अडचणी आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे.मध्यप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आघाडी फार काळ टिकवत नाही, असा या पक्षाचा आरोप आहे.सलमान खुर्शीद म्हणाले की, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकांत पराभव करणे हाच आघाडी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. हा मूळ हेतूच विसरला गेला, तर अपेक्षित यश मिळणार नाही. त्यात आघाडीतील प्रत्येक पक्षाचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस