शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 07:02 IST

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने केंद्र सरकारच्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आमचा पक्ष या विधेयकाला राज्यसभेत विरोध करील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केले आहे.याआधीही जनता दल (संयुक्त)ने तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोधच केला होता. राज्यसभेत भाजपचे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आतापर्यंत तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते आणि केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागला होता.आता नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली असली आणि ते लोकसभेत मंजूर होणार, हे स्पष्ट असले तरी राज्यसभेत विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देणार नाहीत आणि त्यांच्यासमवेत जनता दल (संयुक्त)चे सदस्यही असतील.

केवळ तिहेरी तलाकविरोधी विधेयकालाच नितीशकुमार यांच्या पक्षाचा विरोध नसून, जम्मू-काश्मीरबाबतचे ३७0 कलम, समान नागरी कायदा आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी या मुद्यांवरही भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षामध्ये मतभेद आहेत. आमचा पक्ष केंद्रात भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी असला तरी त्याचा अर्थ आम्हाला भाजपचे सारे म्हणणे मान्य आहे, असा होत नाही, हे जनता दलाने आधीच स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाबाबत सरकारने अल्पसंख्यांक समाजातील लोकांशी चर्चा करायला हवी, त्यांचे म्हणणे जाणून घ्यायला हवे, सरकारने आपली भूमिका त्यांना पटवायला हवी. तसे न करता बहुमताच्या जोरावर विधेयक मान्य करून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून त्या समाजात अस्वस्थता निर्माण होईल, हे जनता दलाचे म्हणणे आहे.राम मंदिराबाबतही दोन्ही समाजांत एकमत व्हायला हवे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे जनता दलाला वाटत आहे.फक्त केंद्रात सोबतच्जनता दल (संयुक्त) हा पक्ष केंद्रातील भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी आहे. याचा अर्थ आम्ही बिहारखेरीज अन्य राज्यांत विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत, असे होत नाही. आम्ही किमान चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत, असेही त्या पक्षाने म्हटले आहे.काश्मीरविषयीच्या ३७0 कलम रद्द करण्याला जनता दलाचा विरोध आहे. तसा प्रयत्न केल्यास काश्मीरमध्ये अशांततेची व दुहीची आणखी बीजे पेरली जातील. संपूर्ण खोऱ्यातील लोकांना भारताविषयी राग उत्पन्न होईल, असे जनता दलाच्या एका नेत्याने बोलून दाखवले.च्त्यामुळे आधी काश्मिरी जनतेशी संवाद साधायला हवा, तेथील जनतेत विश्वास निर्माण करायला हवा. राजकीय सामोपचारातूनच काश्मीर प्रश्न सुटेल, त्याकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समजून चालणार नाही, अशी त्या पक्षाची भूमिका आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारtriple talaqतिहेरी तलाक