केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेलं वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर लोकसभेमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या दुरुस्ती विधेयकावर मतदान होण्यापूर्वी त्यामध्ये असदुद्दीन ओवेसींसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या. लोकसभा अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या.
वक्फ दुरुस्ती विधेयकावर बुधवारी दिवसभर चाललेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षांमधीन अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या होत्या. या दुरुस्त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने फेटाळून लाववण्यात आल्या. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, राजीव रंजन यांच्यासह विरोधी पक्षांमधील इतर खासदारांनी विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या होत्या. मात्र या दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळण्यात आल्या. याशिवाय काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनीही काही दुरुस्त्या सूचवल्या होत्या. मात्र याही दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या.
दरम्यान, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकामधील दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये सरकारच्या बाजूने २८८ मते पडली. तर विरोधामध्ये २३२ मते पडली.