शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्याला आखाडा परिषदेचा विरोध

By admin | Updated: October 7, 2016 01:37 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेने टाउन प्लॅनच्या वतीने त्र्यंबकेश्वर शहरासाठी नवीन तयार केलेल्या विकास आराखड्याला त्र्यंबकेश्वरमधील दहाच्या दहा आखाड्यांनी तीव्र हरकत घेतली असून हा आराखडा रद्द करण्यात यावा आणि सिंहस्थाच्या नावाखाली गावातील रस्ते रुंदीकरण (जे आराखड्यात दर्शविले आहे) तेही रद्द व्हावेत, असा प्रस्ताव येथील षडदर्शन आखाडा परिषदेने केला आहे. ‘ा प्रस्तावाच्या प्रती त्र्यंबक नगर परिषद टाउन प्लॅनिंग नाशिक, नगरविकास मंत्रालय व मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून देण्यात येणार आहेत.

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेने टाउन प्लॅनच्या वतीने त्र्यंबकेश्वर शहरासाठी नवीन तयार केलेल्या विकास आराखड्याला त्र्यंबकेश्वरमधील दहाच्या दहा आखाड्यांनी तीव्र हरकत घेतली असून हा आराखडा रद्द करण्यात यावा आणि सिंहस्थाच्या नावाखाली गावातील रस्ते रुंदीकरण (जे आराखड्यात दर्शविले आहे) तेही रद्द व्हावेत, असा प्रस्ताव येथील षडदर्शन आखाडा परिषदेने केला आहे. ‘ा प्रस्तावाच्या प्रती त्र्यंबक नगर परिषद टाउन प्लॅनिंग नाशिक, नगरविकास मंत्रालय व मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून देण्यात येणार आहेत.त्र्यंबकेश्वर येथील षड्दर्शन आखाड्याची बैठक श्रीपंचायती उदासीन (बडा) आखाडा येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती होते. यावेळी दहाही आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उदासीन नया आखाड्याचे महंत जगता मुनी म्हणाले, सिंहस्थाच्या नावाखाली शाही मिरवणुकीसाठी गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण तीन मीटर धरले असून या नऊ मीटर रस्त्यामुळे गावातील सर्व इमारती ज्या जमीनदोस्त होणार आहेत. सर्व शहरात पडझड होणार आहे. आम्ही आतापर्यंत शाही मिरवणुका केल्या मात्र कुठेही मुख्य रस्त्याने अडचणी भासल्या नाहीत. ज्या अडचणी आल्या त्या संबंधितांनी दूर केल्या; मात्र शाही मार्ग आमच्यासाठी पर्याप्त आहे, पुरेसा आहे. आगामी काळात अडचणी होऊ नये म्हणून जर आराखडा तयार केला असेल तर रिंगरोडने शाही नेण्यास आमची तयारी आहे असेही जगतारमुनी व अन्य महंतांनी सांगितले. सिंहस्थातील विकासाच्या नावाखाली विकास आराखडे यापूर्वी केले, आताही केले यासाठी आखाड्याच्या जमिनी शासनाने घेतल्या आहेत. त्याचा मोबदला तर अद्याप दिला नाहीच, पण आखाड्याच्या जमिनी मात्र बळकावल्या. यास्तव तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्यात यावा. शहरात कोणतेही फेरबदल करू नये, असे शेवटी निवेदनात व हरकत अर्जात म्हटले आहे. यावेळी जुना आखाडा महंत ठाणापती ओमानंद सरस्वती, महंत सागरानंद सरस्वती-अध्यक्ष, अगनी आखाड्याचे महंत अभयानंद ब्रšाचारी, महानिर्वाणी आखाड्याचे महंत कलमेशगिरी, निरंजनी आखाडा महंत कुमारगिरी, आनंद आखाडा महंत शंकरानंद सरस्वती, अटल आखाडा महंत उदयगिरी, उदासीन बडा आखाडा महंत बालकमुनी, नया उदासीन आखाडा महंत जगतारमुनी, निर्मल आखाडा महंत राजेंद्रसिंह, गोरक्षनाथमठ योगी, अश्विनीनाथ, योगी यशताप, आखाडा परिषद-प्रवक्ता-महंत बिंदूजी महाराज, जुना आखाडा नीलपर्वत-भानापती-महंत सुखदेवगिरी, महंत सुमेरगिरी, उदासीन बडा सुंदरगिरी, देवीदास, ओमकारगिरी आदि उपस्थित होते.