शिवसेनेच्या कोलांट्या उड्या उद्यानात मोबाईल टॉवर बसविण्यास परवानगीनंतर विरोध
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
शिवसेनेच्या कोलांट्या उड्या
शिवसेनेच्या कोलांट्या उड्या उद्यानात मोबाईल टॉवर बसविण्यास परवानगीनंतर विरोध
शिवसेनेच्या कोलांट्या उड्याउद्यानात मोबाईल टॉवर बसविण्यास परवानगीनंतर विरोधमुंबई : उद्यानामध्ये मोबाईल टॉवर्सला परवानगी देणार्या शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णयाला स्वगृहातूनच विरोध होऊ लागला आहे़ शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून चेंबूरमधील उद्यानात असे टॉवर उभे करण्यास विरोध दर्शविला आहे़ मात्र शिवसेनेच्या शिलेदाराला उशीरा सुचलेल्या या शहाणपणाबद्दल विरोधी पक्षांनी भुवया उंचाविल्या आहेत़फोर जी कनेक्शनचे ४०७ मोबाईल टॉवर्स उद्यानांमध्ये उभारण्याची परवानगी पालिकेने नुकतीच दिली़ स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजपा युतीने बहुमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली़ मात्र चेंबूरच्या उद्यानांमध्ये ११ मोबाईल टॉवर बसविणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याची तक्रार ११ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे़स्थानिक रहिवाशांकडून तक्रारी येत असल्याने मोबाईल टॉवरचे काम तात्काळ थांबविण्याची सुचना त्यांनी केली आहे़ मात्र हा प्रस्ताव युतीनेच मंजूर केला असताना शेवाळे यांना उशीरा जाग का आली? एखादा मंजुरी दिल्यानंतर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम रोखणार कसे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे़ समाजवादी पक्षानेही यास दुजोरा देत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)चौकट* मुंबईत १२०० मोकळी भूखंड आहेत़ यापैकी ४०७ उद्यानांमध्ये मोबाईल टॉवर उभे राहणार आहेत़ * याचा सर्वाधिक फटका माटुंगा, सायन या विभागांना बसणार आहे़ या विभागांमधील उद्यानांमध्ये तब्बल ३१ मोबाईल टॉवर्स उभारण्यात येणार आहेत़