शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:16 IST

Government Jobs in banking sector : एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. सध्या एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये जागा सुटलेल्या आहेत. एलआयसीसाठी अर्ज भरायला तर फक्त तीन दिवस उरले आहेत. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. नाहीतर मित्र, शेजारच्याची कधी निवड झाली आणि तो कधी नोकरीला लागला, हे सांगण्यातच आयुष्य जाण्याची वेळ येणार आहे. अशी वेळ येऊ द्यायची नाहीय ना....

SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत. 

एलआयसी, BECIL एम्स नंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...  

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक