शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ साठी नव्या चेहऱ्यांना संधी; मंत्रिमंडळ विस्तारासोबत भाजपा संघटनेत होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 21:40 IST

पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

नवी दिल्ली - पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली. पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल केले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू होती. जानेवारी महिन्यात विस्तार होईल बोलले गेले. त्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विस्ताराबाबत निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होती. 

यानंतर १० जून ही नवीन तारीख आली. ही तारीखही निघून गेली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. पंतप्रधान याच आठवड्यात अमेरिकेला रवाना होत आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असताना भाजप देशभरात महिनाभर महासंपर्क अभियान राबवत आहे. ३१ मेपासून सुरू झालेला हा उपक्रम ३० जूनपर्यंत चालणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात फेरबदलज्यासाठी भाजपा एनडीएचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. तेलगू देसम पक्ष, जेडीएस, अकाली दल आणि हम सारख्या पक्षांशी सतत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर काही प्रादेशिक पक्षांसोबत युतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. २०१९ मध्ये मोदी पार्ट-२ सरकार स्थापन झाल्यापासून जुलै २०२१ मध्ये एकदाच फेरबदल झाला आहे. यानंतर १८ मे रोजी किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय घेण्यात आले. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघनाद यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तर मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन मोठे फेरबदल करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून काही लोकांना पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते. तसेच संघटनेतील अनेक बड्या चेहऱ्यांना डच्चू दिला जाईल असं निश्चित मानलं जात आहेत. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले की, कोण बाहेर आणि कोण आत हे फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोनच लोकांना हे माहित आहे, बाकी सर्व अंदाज वर्तवत आहेत.

पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. लोकसभेतील खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य द्यावे, असे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली आहे त्यांना काढलं जाणार नाही. गेल्या फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना वगळण्यात आले होते. जेडीयू एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर आरसीपी सिंह यांचीही जागा रिक्त आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल ही राज्ये भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांतील नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी बातमी आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा