शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

माझ्याविषयीच्या द्वेषामुळेच विरोधक एकत्र येत आहेत- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 05:58 IST

माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.

नवी दिल्ली : माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.‘स्वराज्य’ नामक आॅनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी आपण शहेनशहा वा घराण्याची सत्ता राबविणारा नेता नाही. मी लोकांतून निवडून आलेला प्रतिनिधी आहे, त्यामुळे माझी जनतेशी कायमच नाळ जोडलेली राहील, असेही म्हटले आहे. या मासिकाने जीएसटीसंबंधात मोदी यांनी केलेली विधाने १ जुलै, जीएसटी दिनी प्रसिद्ध केली होती. उर्वरित राजकीय भाग मंगळवारी प्रसारित केला असून, त्यात मोदी यांनी विरोधी पक्षांकडे देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम नसल्याचाही आरोप केला आहे. देशाच्या विविध भागांत होणारे दहशतवादी हल्ले हा इतिहास झाला आहे, यूपीए सरकारच्या काळातच ते होते, असे सांगून जम्मू-काश्मीरमध्ये जबाबदार व उत्तरदायी प्रशासन देण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, नक्षलवाद्यांच्या हिंसाचारातही कमालीची घट झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी आमच्या सरकारची भूमिका असून, पायाभूत सुविधा व सामाजिक विकास यालाच आमचे सरकार प्राधान्य देत आहे, असेही ते म्हणाले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर नक्षल प्रभावित ३४ जिल्ह्यांमध्ये ४५00 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले, २४00 मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले आणि आणखी ४0७२ टॉवर्सना परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर ११ जिल्ह्यांत मिळून नवोदय व जवाहर केंद्रीय विद्यालये सुरू झाली आहेत, त्यामुळे नक्षलग्रस्त भागांतील लहान मुलांना शिक्षण मिळू लागले आहे, असे मोदी यांनी मुलाखतीत नमूद केले. देशातील १२६ जिल्हे पूर्वी नक्षलग्रस्त होते. पण त्यापैकी ४४ जिल्ह्यांतील त्यांचा प्रभाव संपवण्यात आम्हाला यश आले आहे, असे ते म्हणाले.ईशान्येकडील राज्यांत आतापर्यंत विकासाची गंगा पोहोचली नव्हती, आम्ही सत्तेवर येताच त्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले, तेथील दहशतवाद मोडून काढला, तेथे अनेक पायाभूत सुविधा दिल्या, आज तेथे विकासाची कामे जोरात सुरू आहेत, अरुणाचल प्रदेशात प्रथमच व्यावसायिक विमान सेवा आता सुरू झाली आहे, त्या राज्यांतील राजकीय अस्थैर्य संपले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.काँग्रेसची धावपळ स्वार्थासाठीगेल्या चार वर्षांत जवळपास सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला, त्यामुळे त्या पक्षाचा उद्दामपणा, उर्मटपणा संपत चालला आहे. खरे तर मतदारांनीच मतपेटीतून तो संपवला आहे. त्यामुळे आघाडीमार्फत ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आता अन्य राजकीय पक्षांच्या मागे धावताना दिसत आहे. अर्थात केवळ स्वार्थासाठी काँग्रेसची ही धावपळ आहे, अशी टीका मोदी यांनी केली.मला ऊ र्जा जनतेतूनच मिळतेसुरक्षेविषयी विचारता पंतप्रधान म्हणाले की, मी जनतेतून आलेला माणूस आहे. मी विविध ठिकाणी जातो, तेव्हा हजारो लोक माझ्या स्वागतासाठी येतात, ते मला हात करतात, बंदिस्त कारमधून त्यांच्या दिशेने हात दाखवणे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कारमधून खाली उतरतो, त्यांच्याशी हस्तांदोलन करतो, त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. हे लोकच माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून मला प्रचंड ऊ र्जा मिळते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी