शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:53 IST

Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रथमच जाहीर  प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. 

आज सहा राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५० बीआरओ यांच्या पायाभरणीच्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, तुम्हाला माहितीच असेल की, काल रात्री भारताच्या सशस्त्र सैन्य दलांनी आपलं शौर्य आणि पराक्रमाचा परिचय देताना एक नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय लष्कराने अचुकता, सतर्कता आणि संवेदशीलतेचा परिचय देत लक्ष्य उद्ध्वस्त केलं. भारतीय लष्कराने कुठल्याही रहिवासी भागाला लक्ष्य केलं नाही.

राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंधूरसाठी मी आमच्या सैन्यदलातील जवान आणि अधिकाऱ्यांना संपूर्ण देशाच्यावतीने धन्यवाद देतो. तसेच लष्कराला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. आम्ही ही कारवाई करताना जिन मोहि मारा, तिन मोहि मारे या मारुतीरायाच्या आदर्शाचं पालन केलं. आम्ही केवळ आमच्या निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्यांनाच मारले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंह