शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:50 IST

Operation Sindoor: 'युद्धाचे स्वरूप वेगाने बदलले आहे. युद्ध आणि शांतता यांच्यातील रेषा अस्पष्ट होत चालल्या आहेत.'

Operation Sindoor:  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्याची जगभरात चर्चा होत आहे. भारतीय सैन्याचे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे प्रमुख तळ कशाप्रकारे उद्ध्वस्त केले, हे साऱ्या जगाने पाहिले. भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोठे विधान केले आहे. सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2025 ला संबोधित करताना एपी सिंग म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर एक राष्ट्रीय विजय आहे."

"मी येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीयाचे आभार मानतो. मला खात्री आहे की, प्रत्येक भारतीयाने या विजयात योगदान दिले आहे. जसे वारंवार सांगितले गेले की, ही एक अशी कारवाई होती, जी सर्व एजन्सींनी, सर्व सैन्याने अतिशय मेहनतीने पद्धतीने पार पाडली. आम्ही सर्व एकत्र आलो अन् सर्वकाही स्वतःहून घडत गेले. आम्ही सत्याच्या मार्गावर चालत होतो, त्यामुळे देवही आमच्यासोबत होता. प्रत्येक भारतीयाला हा विजय हवा होता आणि तो या विजयाची वाट पाहत होता," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नौदल प्रमुख काय म्हणाले? सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी म्हणाले, "युद्धाचे स्वरूप वेगाने बदलले आहे आणि ते अजूनही बदलत आहे. युद्ध आणि शांतता यांच्यातील रेषा अधिकाधिक अस्पष्ट होत चालल्या आहेत. आपल्याला हे देखील माहित आहे की, दहशतवादी कृत्यांसारखे अपारंपारिक धोके व्यापक संघर्षात बदलू शकतात," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल