Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानी सैन्यांत चार दिवस भीषण चकमक झाली, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. दरम्यान, आता श्रीनगरमधील डल सरोवरात पाकिस्तानी क्षेपणास्त्र फतह-1 सापडल्याची माहिती समोर आली आहे.
सरोवराच्या स्वच्छतेदरम्यान तुकडा सापडले
शनिवारी डल सरोवराच्या नियमित स्वच्छतेदरम्यान सरोवर संरक्षण व व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना हे क्षेपणास्त्र सापडले. हे ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय संरक्षण प्रणालीने पाडले होते. कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे तपासणी आणि पुढील कारवाईसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केले आहे.
श्रीनगर हादरवणारे स्फोट
ऑपरेशन सिंदूरदरम्यान 10 मे रोजी श्रीनगरमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. त्यावेळी एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू डल सरोवरात कोसळली होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही वस्तू पाण्यात पडताच सरोवराच्या पृष्ठभागावर धूर पसरला होता. आता या सरोवराची स्वच्छा सुरू असताना, हेच फुसकी क्षेपणास्त्र सापडले आहे.
ऑपरेशन सिंदूर?
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची धर्म विचारून हत्या केली होती. त्या घटनेनंतर, भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या मोहिमेत भारताने PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हल्ले हाणून पाडले.
त्या कारवाईत अनेक पाकिस्तानी विमानेही भारतीय सैन्याने पाडली होती. तसेच, भारताने पाकिस्तानचे 11 एअरबेसही उद्ध्वस्त केले होते. भारताचे हल्ले पाहून घाबरलेल्या पाकिस्तानने चार दिवसानंतर शरणागती पत्करावी लागली आणि सीजफायरची मागणी केली.