शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन कावेरी : सुदानमधून 600 हून अधिक नागरिक सुरक्षितपणे भारतात दाखल, 3500 भारतीय अजूनही अडकले आहेत; बचावकार्य सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:45 IST

सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे.

नवी दिल्ली : सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव मोहीम राबवत आहे. सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे. या ऑपरेशनअंतर्गत आतापर्यंत किती भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यात आले आहे, यासंदर्भात परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, "15 एप्रिलपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. सुदानमध्ये जवळपास 3500 भारतीय आणि 1000 पीआयओ असल्याचा आमचा अंदाज आहे." याशिवाय, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तिसरे नौदलाचे जहाज आयएनएस तरकश देखील आज सुदान बंदरावर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला आणि अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जवळपास 600 लोक भारतात पोहोचले आहेत. 246 लोकांना महाराष्ट्र राज्यात पाठवले जात आहे", असे विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. तसेच, भारताला अनेक विनंत्या मिळाल्या आहेत, ज्यामध्ये इतर देशांच्या नागरिकांनाही स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे, अशीही  परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली. 

आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आफ्रिकन देश सुदानमधून आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 360 भारतीयांना सौदी अरेबियातून चार्टर फ्लाइटद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. 246 प्रवाशांना सी-17 विमानातून महाराष्ट्रात पाठवले जात आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, 495 भारतीय अजूनही जेद्दाहमध्ये आहेत, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे.

सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खार्तूमसुदानमधील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या खार्तूममधून भारतीयांना सुदानच्या सुरक्षित बंदरात आणण्यासाठी बसेसचा वापर केला जात आहे. मात्र, तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थितीत सर्वांना सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. सर्वांना खार्तूमहून सुदान बंदरात आणले जात आहेत, जिथे भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस तरकश आधीच उपस्थित आहे. 

टॅग्स :Indiaभारत