शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार, लवकरच भगवा फडकणार - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:45 IST

राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.

ठळक मुद्देराम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहेकर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं 'राम मंदिरावर लवकर भगवा झेंडा फडकताना दिसेल. राम जन्मभूमीवर दुसरं कोणतंच बांधकाम होऊ शकत नाही'

बंगळुरु - राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबरला अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. त्याआधी मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. 

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन भागवत बोलले आहेत की, 'राम मंदिरावर लवकर भगवा झेंडा फडकताना दिसेल. राम जन्मभूमीवर दुसरं कोणतंच बांधकाम होऊ शकत नाही'. राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं आणि त्याच दगडाने त्याचं बांधकाम केलं जाईल असं मोहन भागवत यांनी सांगितलं. यावेळी मोहन भागवत यांनी गाईंची सुरक्षा केलीच पाहिजे यावर जोर दिला. 'जोपर्यंत गोहत्येवर बंदी येत नाही, तोपर्यंत आपण शांततेने जगू शकत नाही', असं मोहन भागवत म्हणाले आहेत. 

 

'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद'अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर एकीकडे राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एक प्रस्ताव ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे. 

चेअरमन सय्यद वसीम रिजवी यांनी सांगितलं होतं की, 'वेगवेगळ्या पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर विचार करुन आम्ही एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मस्जिद बांधण्याबद्दल सांगण्यात आलं आहे. कारण हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे देशात शांतता आणि बंधुभाव टिकून राहिल'. 31 ऑक्टोबरला सय्यद वसीम रिजवी यांनी बंगळुरुत श्री श्री रवीशंकर यांची भेट घेत वाद शांततापुर्ण मार्गाने सोडवण्यासंबंधी चर्चा केली होती. 

श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सय्यद वसीम रिजवी बोलले होते की, 'संपुर्ण देश आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचा आदर करतो. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद मित्रत्वाने मिटला पाहिजे असं शिया समाजाचं म्हणणं आहे'. यासोबत रिजवी यांनी सांगितलं होतं की, 'या मुद्दयावर शिया पंथियांना आपलं मत मांडण्याचा पुर्ण हक्क आहे. कारण 1944 पासून शिया बाबरी मस्जिदमध्ये नमाजाला जात होते. शिया प्रशासनाकडून चालवण्यात येणारी ही मस्जिद सुन्नी पंथियांनी आपल्या नावाने रजिस्टर केली होती. मात्र नंतर बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं'.

दुसरीकडे शिया पर्सनल लॉ बोर्ड मात्र मस्जिद जागेवरुन हटवण्यात तयार नाहीत. बोर्डाचे संस्थापक मौलाना सय्यद अली हुसे रिजवी यांनी सांगितलं की, 'शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी नाटकं करत आहेत. रिजवी संपुर्ण शिया पंथाला बदनाम करत आहेत. कायदेशीर अटक टाळण्यासाठी ते आरएसएसची भाषा बोलत आहेत'. 'अयोध्येत राम मंदिर उभारण्यावर मुस्लिमांचा काहीच आक्षेप नाही. पण बाबरी मस्जिदच्या जागेवर कब्जा करत मंदिर उभारलेलं कोणत्याही मुस्लिमाला मान्य नाही', असंही ते बोलले आहेत. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ