शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:48 IST

दिल्लीतील रोहिणी मतदार संघाचे भाजप आमदार विजेंद्र गुप्ता केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही कुटुंबवाद फोफावत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.  

नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे केजरीवाल आता काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे दुसरे नेते ठरले आहे. मात्र केजरीवालांच्या शपथविधीला जवळजवळ संपूर्ण विरोधीपक्ष गायब होता. एका भाजपनेत्याने या शपथविधीला हजेरी लावली. मात्र या नेत्याला कार्यक्रमात बसण्यासाठी आसन मिळाले नाही की, कारसाठी पार्किंग. खुद्द या नेत्यानेच असा आरोप केला आहे.

दिल्लीतील रोहिणी मतदार संघाचे भाजप आमदार विजेंद्र गुप्ता केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही कुटुंबवाद फोफावत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.  

मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे. मात्र आपमध्ये कुटुंबवाद सुरू झाला आहे. शपथविधीला हजेरी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य होते. मात्र कार्यक्रमात नातेवाईकांना समोरच्या रांगेत बसविण्यात आले आहे. मला मागच्या रांगेत ढकलण्यात आल्याचे विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी 'आप'च्या शपथविधी सोहळ्यात आपल्याला बसण्यासाठी आसण आणि गाडीसाठी पार्किग मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.