शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

पाकच्या सीमेवरील २,0६१ पैकी फक्त ६१६ दिवे सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:05 AM

गुजरातमधील भुज, कच्छ भागात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घातले असून, तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २,०६१ वीजदिवे बसविण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : गुजरातमधील भुज, कच्छ भागात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घातले असून, तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २,०६१ वीजदिवे बसविण्यात आले आहेत. त्यातील फक्त ६१६ दिवेच सुरू असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ही माहिती दिली आहे. सीमेवर ८२ जनरेटर असून, त्यातील फक्त ३८ व्यवस्थित सुरू आहेत. साधनांची नादुरुस्ती व कमतरतेमुळे सीमेवर टेहळणी करण्याच्या कामात खूप अडथळे येत आहेत. या बैठकीला बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा उपस्थित होते. त्यांनी या खात्याच्या अधिकाºयांबरोबर अन्य प्रकल्पांसंदर्भातही चर्चा केली.भारताच्या चार राज्यांलगत पाकिस्तानची सीमा आहे. तिची लांबी जम्मू- काश्मीरमध्ये (१,२२५ कि.मी.), राजस्थान (१,०३७ कि.मी.), पंजाब (५५३ कि.मी.), गुजरात (५०८ कि.मी.) इतकी आहे. सीमेचे कुंपण तोडून पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार बहुतकरून रात्री किंवा पहाटे घडतात. त्यामुळे सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता तेथे टेहळणीसाठी असलेले सर्व दिवे सुरू असणे हे अत्यंत आवश्यक आहे. या वीजदिव्यांची देखभाल केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाते. भुज, गांधीनगर येथील जनरेटरची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होईल, असे या खात्यातर्फे बीएसएफला सांगितले.काश्मीरमध्येही काम अर्धवट]जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवरील २८ कमांड पोस्टपैकी फक्त तीनच आजवर बांधून पूूर्ण झाल्या आहेत. तसेच १७ पोस्टचे बांधकाम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. उरलेल्या आठ पोस्टचे काम अद्याप सुरूच करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या भागात नदीकिनारी भागात ४३ हायमास्ट दिवे बसविण्यात येणार होते.त्यातील फक्त २५ दिवे बसविण्यात आले असून, बाकी तीन दिव्यांचे काम कासवगतीने सुरू आहे. उर्वरित १५ हायमास्ट दिवे बसविण्याचे काम कधी सुरू करणार, याबद्दल काहीही हालचाल नाही.

टॅग्स :Indiaभारत