शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून २८ पैकी केवळ ४ जणांना तिकीट; ४ मंत्र्यांना डच्चू, लोकसभेत उतरविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:43 IST

सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ५६ जागांसाठी २८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भाजपने आज चार राज्यांमधील आणखी १२ उमेदवारांची नावे जाहीर करताना आणखी चार केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारले. यापूर्वी भाजपने राज्यसभेच्या १६ जागांची नावे जाहीर केली होती. झारखंडमधील एका जागेसाठीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. 

सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ५६ जागांसाठी २८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. निवृत्त होणाऱ्या २८ पैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपने महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नाही. भाजप नेतृत्वाने आपल्या अनेक मंत्र्यांना तिकीट नाकारले; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव (राजस्थान) आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (महाराष्ट्र) यांना तिकीट नाकारले आहे. 

भाजपने काय दिले संकेत?भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांसारख्या सात केंद्रीय मंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेते आणि निवृत्त राज्यसभा सदस्यांना पुन्हा तिकीट दिलेले नाही. पक्षाचे हे पाऊल आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी अनेकांना रिंगणात उतरविण्याचे संकेत मानले जात आहेत.

राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम?जावडेकर आणि राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला की नाही, हे एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच ठरेल. भाजपश्रेष्ठींनी ठरविल्यास प्रकाश जावडेकर पुणे लोकसभा मतदारसंघातून, नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून, तर डॉ. विनय सहस्रबुद्धे ठाणे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढू शकतात.

विनाेद तावडे मुंबईतून?भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची राज्यसभा सदस्यत्वासाठी चर्चा होती. आता त्यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळेल काय याची चर्चा आहे. पीयूष गोयल यांनाही उत्तर किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई, तर शरद पवार गटाकडून पवार यांच्या विश्वासू वंदना चव्हाण यांनाही लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळू शकते.

जे. पी. नड्डा  गुजरातमधूनराज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे ओडिशातून राज्यसभेचे तिकीट राखण्याबाबत भाग्यवान ठरले. माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनीही त्यांची मध्य प्रदेशातील जागा राखली आहे. जे. पी. नड्डा यांना हिमाचलऐवजी गुजरातमधून स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा